गहेनाची 'गंदी बात' : 'या' हायप्रोफाईल व्यक्तीला बेड्या

 मुंबई :  मॉडेलला फसवून पॉर्न फिल्म बनवल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री गेहना वशिष्ठ नंतर आता उमेश कामत नावाच्या एका हायप्रोफाईल व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे उमेश कामत हा एका बड्या उद्योजकाचा पीए होता. त्यामुळे आता या प्रकरणात मोठी नावे समोर येणार, अशी शंका व्यक्त केली जात आहे. 

परदेशातही या पॉर्न फिल्मचे जाळे पसरल्याचे तपासात समोर आले आहे. कामत हा देशातील खुप मोठ्या उद्योगपतीचा पीए होता. नोकरी गेल्यानंतर तो पॉर्नच्या धंद्यात शिरल्याचे सांगितले जात आहे. परदेशी ऍपला पार्न फिल्म विकून तो आणि गेहना कोट्यवधी रुपये कमावत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. 

'हॉट मुव्ही' नावाची वेबसाईट तयार करुन त्यावर या फिल्म विकल्या जात होत्या.  त्याचे परदेशातील सोर्स वापरुन या फिल्म जगभर विकत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.  हा व्हिडीओ केव्हा आणि कसा अपलोड करायचा, यासंबंधीचे सर्व निर्णय तोच घेत होता. पोलिसांनी त्याला अटक केल्यामुळे आता याप्रकरणातील आणखी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

पॉर्न रॅकेटचा प्रदाफाश

चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये काम मिळवून देण्याचं आमिष दाखवून तरूण-तरुणींना पॉर्न इंडस्ट्रीच्या जाळ्यात ओढणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मढ येथील ग्रीन विला या बंगल्यामध्ये अश्लिल शूटिंग चालल्याची माहिती क्राईम ब्रांचला मिळाली होती. त्यावरून बंगल्यावर छापा टाकला. यावेळी अश्लिल दृष्याचे चित्रीकरण सुरू होते. पोलिसांनी पाच जणांना अटक केली. यामध्ये अभिनेत्री गहना वशिष्ठ देखील होती. विशेष म्हणजे तीच या तथाकथित वेबसिरीजची मेकर असल्याचे समोर आले आहे. तिच्यासह दोन अभिनेते, एक ग्राफिक डिझायनर  महिला, एक फोटोग्राफर आणि एका कॅमेरामनला अटक झाली आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !