दिल्ली हिंसक आंदोलन प्रकरण - 'या' अभिनेत्याला अटक

नवी दिल्ली : नवीन तीन कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात 26 जानेवारी रोजी झालेल्या दिल्ली हिंसाचार प्रकरणी अभिनेता दीप सिद्धू याला आज पोलिसांनी अटक केली. दीप सिद्धूवर  लाल किल्ल्यावर झेंडा फडकवण्यात आणि शेतकऱ्यांना भडकवण्यात सहभागी असल्याचा आरोप आहे.

दीप सिद्धूला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. 26 जानेवारीपासून मुख्य आरोपी दीप सिद्धू फरार होता. त्याला पकडून देणार्यास एक लाख रुपयाचे बक्षीस दिल्ली पोलिसांनी जाहीर केले होते. पण, दीप सोडून लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारे गँगस्टर लक्खा सिधाना आणि जुगराज अद्याप बेपत्ता आहेत. 

दिल्ली पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्या सुमारे 50 जणांचे फोटोही जारी केले आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी देशद्रोह आणि युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलीस स्पेशल सेल करत आहे.

 प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान हिंसाचार झाला होता. यावेळी आंदोलकांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला आणि तेथे ध्वजस्तंभावर धार्मिक ध्वज फडकवला होता.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !