बॅड न्यूज - एप्रिलपासून कर्मचाऱयांच्या पगारात होणार कपात ?

मुंबई : कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात एक महत्वाची आणि तेव्हढीच काळजीची बातमी समोर येते आहे. एप्रिल महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या हातात कमी पगार येणार असल्याची माहिती समोर आली आहे. नवीन कामगार विधेयकांत बदल झाला असून त्यानुसार सरकारने कामाचे तास, पीएफचे नियम बदलले आहेत.

येणाऱ्या काळात ग्रॅज्यूएटी, पीएफ, कामाच्या तासांमध्ये मोठा बदल पहायला मिळू शकतो. यामुळे कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्यूएटी आणि पीएफमध्ये वाढ होणार असल्याचे सांगितले जातेय. मात्र हातात येणारा पैसा म्हणजे टेक होम सॅलरी कमी होणार आहे.  

ग्रॅज्यूएटी आणि पीएफमध्ये वाढ झाल्याने रिटायरमेंटनंतर मिळणाऱ्या पैशांमध्ये देखील वाढ होणार आहे. कंपन्यांच्या बॅलन्स शीटवर देखील याचा परिणाम दिसून येणार आहे.

गेल्या वर्षी संसदेत पारित केले गेलेले तीन कामगार विधेयके १ एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे. वेतनाच्या नव्या परिभाषेनुसार, भत्ते एकूण सॅलरीच्या जास्तीत जास्त 50 टक्के असतील.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !