मुंबई : दहावी आणि बारावीच्या पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परिक्षाच विद्यार्त्याना द्यावी लागणार असा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आला आहे.
एप्रिल महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेला बसणार्या रिपीटर आणि श्रेणीसुधारची सवलत घेणाऱ्या विद्यार्थ्याना २४ टक्के अभ्यास कपातीचा कोणताही लाभ दिला जाणार नाही.
कोरोनाच्या पार्शवभूमीवर २४ जुलै रोजी दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता.
गेल्या पाच महिन्यांपासून कुठल्याही शाळा व खासगी क्लासेस सुरु नव्हती. त्यामुळे विद्यार्थयांवर अभ्यासाचा बोजा वाढला आहे. त्यात आता एन परीक्षेच्या आधी बदल करण्यात आल्याने विद्यार्थयांवरील ताण वाढणार आहे.