मुबई : विधानसभा अध्यक्ष्यपदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांनी छेद दिला आहे.
नाना पटोले म्हणाले, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी माझ्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार असले तरी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. म्हणूनच पक्षश्रेष्ठींनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवेन आणि काँग्रेसला राज्यात क्रमांक १ चा पक्ष बनवून दाखवेन.
दरम्यान, पटोलेंच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपद आता खुले झाले आहे, असे पवार म्हणाले होते. या वक्तव्याला छेद देताना पटोले म्हणाले, की विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे होते आणि काँग्रेसकडेच राहील. काँग्रेस पक्षश्रेष्ठी कोणाला अध्यक्ष करायचे याचा निर्णय घेतील.