नाशिक : राज्यात काँग्रेसला मजबूत करण्यासाठी पक्षाने नेतृत्वस्तरावर बदल करत नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्ती केली आहे. त्यांनी पदाची सूत्रे अजून स्वीकारली नाही तोवरच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मालेगावात माजी आमदार आसिफ शेख यांनी प्रदेशाध्य्यक्षननाना पटोले यांच्याकडे सदस्यत्वाचा राजीनामा सोपविल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
राजीनामा देण्यामागील कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरीअसिफ शेख राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे. ते काँग्रेसचे जुने नेते आहेत. त्यांचे वडील रईस शेख हे माजी आमदार होते. काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सध्या मालेगाव महापालिकेत काँग्रेसचीच सत्ता आहे. त्यामुळे आसिफ शेख यांनी थेट राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.