शेवगाव : पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीला विरोध करत शेवगाव शिवसेना व युवासेना यांच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलनाद्वारे केंद्राचा निषेध केला.
शिवसेना तालुकाप्रमुख ॲड. अविनाश मगरे आणि शिवसेना शहरप्रमुख सिद्धार्थ काटे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
देशामध्ये केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅस ची भरमसाठ केलेली दरवाढी मुळे महागाईचा भस्मासुर वाढून शेतकरी, सर्वसामान्य लोकांना जगणे मुश्किल झाले आहे. या भस्मासुराला वेळीच आवर घातला नाही तर देशात मोठ्या प्रमाणात लोकभावनेचा प्रक्षोभ होईल, या सर्वच बाबी लक्षात घेऊन शिवसेनेने राज्यव्यापी आंदोलन उभे केले आहे.
जिल्हा संपर्कप्रमुख संजय घाडी, जिल्हा सह - संपर्कप्रमुख डॉ. विजय पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख नंदकुमार मोरे , जिल्हा प्रमुख (दक्षिण) राजेंद्र दळवी, तालुका प्रमुख ऍड. अविनाश मगरे, शिवसेना शहरप्रमुख सिद्धार्थ काटे, युवासेना तालुकाप्रमुख शितल पूरनाळे, तालुकासंघटक महेश पूरनाळे, चंद्रशेखर ढवळे, महिला आघाडीच्या मंदाकिनी कुलकर्णी, ज्योती केदारी, स्वाती कुलकर्णी, लता ढवळे, कृष्णा कुलकर्णी रमेश पाटील, विकास भागवत, उदय गांगुर्डे, अशोक शिंदे, विठ्ठल घुले, देविदास चव्हाण, महेश मिसाळ, सुनील जगताप, ॲड अतुल लबडे, गणेश ढाकणे, गणेश चेमटे, दुबे, गणेश पोटभरे, ज्ञानेश्वर धनवडे, अरुण काटे, अशोक गवते, कृणाल साळवे, किरण मगर, अमोल काशीद, अमोल राऊत आदी उपस्थित होते.