पोलीस उपनिरीक्षक गोरक्षनाथ खरड यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार

नाशिक : जिजाऊ बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२१ पाचोड (औरंगाबाद) येथे कार्यरत पोलीस उपनिरीक्षक गोरक्षनाथ खरड यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे वितरण शिवजयंतीच्या पावन पर्वावर वैजापूर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

पोलिस उपनिरीक्षक खरड हे मूळचे शेवगाव (जि. अहमदनगर) तालुक्यातील सामनगांवचे आहेत. पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे विद्यापीठात झाले आहे. पोलिस खात्यात भरती झाल्या नंतर पुणे, गडचिरोली, गोंदिया येथे त्यांनी कर्तव्य बजावले आहे.  २०१७ पासून ते औरंगाबाद ग्रामीण विभागात पाचोड येथे कार्यरत आहेत.  गंभीर गुन्ह्याची उकल केली, जातीय-धार्मिक सलोखा राखणे, कोणतीही घटना घडल्यानंतर तत्काळ घटनास्थळी जाऊन योग्य कार्यवाही करणे, समाजातील सर्व घटकांशी चांगला समन्वय, चांगला जनसंपर्क ठेवणे, सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून काम करणे अशी दर्जेदार कामगिरी त्यांनी बजावली आहे. 

सामाजिक भान

नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यात काम करत असताना खरड यांनी पोलीस भरती मार्गदर्शन केंद्र चालवुन दुर्गम भागातील शेकडो अदिवासी, दलित मूला मुलींना मोफत मार्गदर्शन केले.  त्यापैकी अनेक जण पोलीस, आर्मी मध्ये भरती झाले आहेत. कोरोना काळात लॉक डाऊन ची घोषणा झाल्यानंतर हातावर पोट असणाऱ्या काही गरीब कुटुंबाना जिल्ह्यात सर्वप्रथम स्व: खर्चाने किराणा, अन्न धान्य वाटप केले. तसेच लॉकडाऊन काळात पोलीस ठाणे पाचोड, दूरक्षेत्र विहामांडवा व परिसरात ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, महसूल विभाग यांच्याशी योग्य समन्वय ठेऊन लॉकडाऊनची अत्यंत प्रभावी पणे अंमलबजावणी केल्याने विहामांडवा व परिसरात कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण सापडले. त्यामुळे हा परिसर सर्वात आधी कोरोना मुक्त परिसर झाला. 

अनाथ आश्रमास वेळोवेळी मदत. रक्तदान शिबीरात सहभाग घेतला आहे.  मोर, हरीण, नीलगाय, पक्षी असे वन्यप्राणी जखमी अवस्थेत मिळाल्यानंतर त्यांचेवर पशुवैद्यकीय अधिकारी यांचे कडून उपचार करून घेऊन वनविभागाच्या ताब्यात किंवा जेथे मिळाले तेथे मोकळे सोडन्याचे काम त्यांनी केले. घाटी रुग्णालयातील गरजू रुग्णांना औषधोपचार साठी माणुसकी ग्रुप च्या माध्यमातून वेळोवेळी मदतकार्य केले. 

जिजाऊ बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड. धनराज अंभोरे, सचीव संतोष दोडे, कार्यक्रमाचे आयोजक सुर्यकांत मोटे यांनी पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !