महावितरण विरोधात शेवगावात भाजपचा हल्लाबोल

शेवगाव : महावितरणच्या जिल्ह्यातील सर्व मंडळांमध्ये आज भाजपा अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शेवगाव येथे महावितरण विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. 

महावितरनाने  75 लाख वीजग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील चार कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे काम करणाऱ्या महावितरणच्या निषेधार्थ आज शेवगाव येथे तळ ठोकून आंदोलन केले. यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी  तालुकाध्यक्ष ताराचंद लोंढे, किसान मोर्चा प्रदेश सदस्य बापूसाहेब पाटेकर, अंबादास ढाकणे ,सरचिटणीस भीमराज सागडे, राजाभाऊ लड्डा, गंगा खेडकर, विनोद मोहिते, वजीर पठाण, कमलेश गांधी, दिगंबर काथवटे, गणेश कोरडे, सागर फडके, नितीन फुंदे, कचरू चोथे, 

अंकुश कुसळकर, सचिन वारकड, नितीन दहीवळकर अशोक गाढे, उमेश भालसिंग, संदीप वाणी, टिकु बंब, मंगेश पाखरे, गणेश जायभाये, उमेश धस, एकनाथ खोसे, नवनाथ कवडे, भाजपा सोशल मीडिया प्रमुख अनिल वडागळे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, महावितरणाच्या निषेधार्थ भाजपाने आज राज्यभर महावितरण केंद्रांवर टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन केले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !