ते आमच्याही घरी आले होते.
वर्गणी मागायला.
तत्पूर्वी सोसायटीच्या सेक्रेटरींनी त्यांना रीतसर परवानगी दिली असल्याचा व्हॉट्स अॅप मेसेज सोसायटीच्या ग्रुपवर टाकला होता. आपल्याच सोसायटीतील सदस्य असतील आणि वर्गणी देणे ऐच्छिक आहे हे देखील नोंदवले होते.
ते आले.
नेहमीचे, हसण्या-बोलण्यातले लोक.
हलक्या स्मितासह त्यांना नकार दिला.
त्यांनी तो सस्मित स्वीकारला आणि गेले.
सोसायटीतील घराघरांवर रामाचे फोटो (!) असलेले ए4 साईजचे, जाड कागदाचे हँगिंग्ज लटकत होते.
मी माझ्या दारावर साध्या कागदावर हाताने लिहिलं -
मंदिर-मस्जिद-गिरजाघरने बाँट लिया भगवान को -
मत बाँटो इन्सान को !
- सुनीती सुलभा रघुनाथ
(यांच्या फेसबुक वॉलवरून साभार)
लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत.