'त्या' सोशल मीडिया पोस्ट्सची होणार चौकशी

नवी दिल्ली - भारतातील सेलिब्रिटींनी नुकतेच इंटरनॅशनल गायिका रिहानाच्या सोशल मीडिया पोस्टनंतर केलेल्या ट्विटरवरील पोस्ट्सची महाराष्ट्रात चौकशी होणार आहे. काँग्रेस नेत्यांच्या मागणीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केले आहेत. या सर्वांनी केलेल्या पोस्ट बहुतांशी एकसारख्याच जणू कॉपी पेस्टच होत्या. या पोस्ट त्यांनी कुणाच्या दबावाखाली येऊन केल्या त्याचा तपास केला जाईल.


कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवरून शेतकऱ्यांनी देशभर त्यातही प्रामुख्याने दिल्ली सीमांवर आंदोलन सुरू केले. त्याच आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर रिहानाने सोशल मीडियावरून समर्थन दर्शवले होते. आपण यावर चर्चा करत नाही असा सवाल तिने केला होता. 

तिच्यासोबतच, पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गने सुद्धा भारतातील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर केला. इतर आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी सुद्धा तिचे समर्थन केले. पण, आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी भारतातील आंदोलनांवर प्रतिक्रिया देणे हे त्यांनी भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप करणे असल्याचे काही सेलिब्रिटींचे म्हणणे आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !