जामखेड : पत्रकाराबाबत केलेल्या चुकीच्या विधानामुळे आदर्शगाव पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे पाटलाविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र मोठी खबल उडाली आहे.
जामखेड येथील मोहा ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहात जानेवारी महिन्यात आरोजित कार्यक्रमात भाषण करताना पत्रकारांना हलकट, हरामखोर म्हणून संबोधले होते. या बाबत तेथील पत्रकारांनी तीव्र निषेध व्यक्त करत तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना गुन्हा दाखल करण्याबाबतचे निवेदन दिले होते.
पत्रकार अशोक निमोणकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून जामखेड पोलिसांनी पेरे पाटलांविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलीस वसाहतीच्या उदघाटन समारंभास जामखेड येथे आलेले गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.