'या' बँकेच्या ग्राहकांना एक हजार पेक्षा जास्त पैसे काढण्यास बंदी

 नवी दिल्ली : कर्नाटकच्या डेक्कन अर्बन बँकेला नवीन कर्ज देण्यावर आणि ठेवी स्वीकारण्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बंदी घातली आहे. याशिवाय ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यातून एक हजाराहून अधिक पैसे काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यांसाठी ही सूचना देण्यात आली आहे. 

दरम्यान, यासंबंधी केंद्रीय बँकेने प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, बँकेची सध्याची स्थिती लक्षात घेता ठेवीदारांना सर्व बचत खाती किंवा चालू खात्यांमधून एक हजार रुपयांहून अधिक रक्कम काढण्याची परवानगी मिळणार नाही.  बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यासंबंधी सूचना दिल्या असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. 

खरंतर, नियामकाने दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण 99.58 टक्के ठेवीदार ठेवी विमा आणि कर्ज हमी कॉर्पोरेशन विमा कॉर्पोरेशन (डीसीजीसी) योजनेंतर्गत आहेत. डीसीजीसी ही आरबीआयची एक सपोर्टिव्ह कंपनी आहे. आरबीआयच्या माहितीनुसार, बँकेवरील बंदीचा अर्थ बँक परवाना रद्द केला असा नाही. आता जारी केलेल्या निर्देशानुसार, बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होईल आणि व्यवहार सुरू राहतील. 19 फेब्रुवारी 2021 ला हा नियम जारी करण्यात आला असून सहा महिने लागू राहिल.


सहकारी बँकेवर घातली बंधने

सहकारी बँकेला कोणतीही पूर्वसूचनेशिवाय नवीन गुंतवणूक किंवा नवीन देनेदारी घेण्यावर बंदी घातली आहे. देशामध्ये शेती आणि ग्रामीण भागात चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य सहकारी संस्था कायद्यांतर्गत सहकारी बँका स्थापन केल्या आहेत. गेल्या वर्षी सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर सर्व सहकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आल्या आहेत.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !