अहमदनगर - सकाळी डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.. दुसरीकडे त्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरु झाली.. अन काय आश्चर्य..! काही वेळाने चक्क त्यांचं हृदयाची धडधड पुन्हा सुरु झाली, अन सगळेच अचंबित झाले.. नाही, नाही, हा कुठल्या सिनेमातील प्रसंग नाहीय, तर ही घटना घडलीय राहुरी येथे.
रविवारी सकाळी असिफा सय्यद यांच्या हृदयाची धडधड थांबल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. पण काही वेळाने, म्हणजे सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्यांचे हदय धडधड करण्यास सुरु झाले. काही वेळातच त्या पुन्हा शुद्धीवर आल्या व बोलु लागल्या.
इतकंच नाही, तर असिफा यांनी त्यांचे पतीला 'आपल्याला घरी जायचे आहे', असेही म्हटले. रुग्णालयात त्यांना भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांशी देखील त्या बोलू लागल्या. हा प्रकार पाहून त्यांचे नातेवाईक देखील चकित झाले.
त्यांचे नातेवाईकांनी तर 'हा चमत्कार असून आता आपण प्रार्थना करुन त्यांना उरलेले आयुष्य निरोगी जगायला भेटो', अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया व हैदराबाद येथुन त्याचे भाऊ त्याच्या अतिम संस्कारासाठी भारतात निघाले होते.
तर सर्वांनाच असिफा भाभी पुन्हा बोलु लागल्याने आनंद झाला आहे. शेवटी 'नुर- ए-हक्क शम्मे इलाही को बुझा सकता हैं कौन, जिसका हामी हो खुदा उसे मिटा सकता हैं कौन' या शायरीचा अनुभव आला आहे. सर्वजण त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करत आहेत.