गौरव पठाडे (अहमदनगर) - रविवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी आद्यनाथाचार्य गुरु मत्स्येंद्रनाथ सेवाभावी ट्रस्ट (नाथभीक्षापात्र फाउंडेशन) द्वारा नाथ भक्तांच्या उपस्थितीत धर्मनाथ बीज उत्साहात साजरी करण्यात आली.
धर्मनाथ बिजेचे औचित्य साधुन आद्यनाथाचार्य गुरु मत्स्येंद्रनाथ सेवाभावी ट्रस्टच्या वतीने मूकबधिर मुलांच्या शाळेत अन्नदान करण्यात आले. तसेच गुरु मत्स्येंद्रनाथ आरतीश्रृंगार तसेच धर्मनाथांची कथा वाचन करण्यात आली.
मानवसेवा व चांगल्या कर्मानेच भगवंत प्राप्ती होते व नाथांप्रमाणेच आपण ही समाजकल्याण व राष्ट्रकल्याण केले तर तिच आपली नाथसेवा होईल, असे ट्रस्टच्या संस्थापक गुरु मीराताई यांनी सांगितले.
धावपळीच्या जीवनात सहज अध्यात्म कसे करावे, त्याचप्रमाणे सांसारिक जीवनात आध्यात्माने स्थिरता कशी प्राप्त होते, यावर देखील गुरुताईंनी मार्गदर्शन केले. यावेळी महाप्रसादाचे व भव्य रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते.