नेवासा (अहमदनगर) - मांडेगव्हाण (ता. नेवासा) येथील सीताबाई केरू शिंदे यांचे अल्पशा आजाराने सोमवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांचे वय ७२ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्या धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या होत्या. शिंगवे तुकाई येथील तुकाई विद्या मंदिर शाळेतील माध्यमिक शिक्षक पांडुरंग केरू शिंदे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
सोमवारी रात्री साडेआठ वाजता मांडेगव्हाण येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता शिंदे वस्ती, राजेगाव रोड, मांडेगव्हाण येथे होणार आहे.