आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा
अहमदनगर - संपदा नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या १३ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरवून तत्कालीन अध्यक्ष तथा घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार ज्ञानदेव वाफारे याच्यासह तिघा जणांना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
ज्ञानदेव वाफारे, त्याची पत्नी सुजाता वाफारे व एका संचालकाला जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. नाईकवाडी यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर इतर बारा जणांना वेगवेगळ्या कलमाखाली ५ ते १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
संपदा नागरी सहकारी पतसंस्थेत सन २००९-१० मध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने शनिवारी वाफारे याच्यासह इतरांना दोषी ठरवले होते. त्याचवेळी १७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या १७ आरोपींना बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.
बुधवारी सकाळी न्यायालयाने अंतिम निर्णय दिला आहे. अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे व त्याची पत्नी सुजाता वाफारे साहेबराव भालेकर, संजय बोरा, रवींद्र शिंदे अशा ५ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अनिल ढगे यांनी बाजू मांडली.
ठेवीदारांच्या वतीने ऍड. अनिता दिघे यांनी व अवसायक मंडळाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ सुरेश लगड यांनी बाजू मांडली. दरम्यान, या खटल्याचा निकाल लागला असला तरी अद्याप ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मात्र अद्याप सुकर झालेला नाही.
हे आहेत इतर आरोपी - सुधाकर परशुराम थोरात, भाउसाहेब कुशाबा झावरे, उत्तमराव दगडू चेमटे, दिनकर बाबाजी ठुबे, विष्णूपंत गणपत व्यवहारे, राजे हसन अमीर, बबन देवराम झावरे, लहू सयाजी घंघाळे, हरिश्चंद्र सावळेराम लोंढे, अनुष प्रविण पारेख, मारूती खंडू रोहोकले, चिमाजी खंडू रोहोकले, बबन खंडू रोहोकले, सुधाकर गोपीनाथ सुंबे, गोपीनाथ शंकर सुंबे, महेश बबन झावरे व संगिता हरिश्चंद्र लोंढे.
हेही वाचा - संपदा पतसंस्था घोटाळ्यात 'ज्ञानदेव वाफारे'सह २२ जण दोषी, 'या' दिवशी सुनावणार शिक्षा