अहमदनगर - नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक तुकाराम भिवसेन जाधव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची शिक्षण क्षेत्रात सर्वोच्च समजली जाणारी पीएचडी पदवी प्राप्त झाली.
त्यांनी 'अहमदनगर जिल्ह्यातील भटक्यांची जीवनशैली व लोकसाहित्य' या विषयावर संशोधन कार्यपूर्ण केले. त्यांना चेतना वरिष्ठ महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ. अरुण कोळी यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या यशाबद्दल मुळा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष यशवंतरावजी गडाख साहेब, उपाध्यक्ष उदयन गडाख, सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे, उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झिने, यांनी अभिनंदन केले आहे.
तसेच डॉ. अशोक तुवर, डॉ. संभाजी दराडे, डॉ. अविनाश साळवे, डॉ. हरिश्चन्द्र सडेकर, डॉ. संदीप खेडकर, डॉ. सीताराम रौदळ, प्रा. बाळासाहेब शिंदे, डॉ. बाळासाहेब खेडकर, डॉ. जगदीश सोनवणे, डॉ. राजेश वाघ, डॉ. रवींद्र खंदारे, डॉ. मिलिंद वाव्हळ, प्रा. शरद औटी, प्रा. योगेश साळवे यांनीही अभिनंदन केले आहे.