येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
घोडेगाव - 'ख्रिस्ती युवा'च्या वतीने घोडेगाव (ता. नेवासा) येथे राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. ९ मार्च रोजी दुपारी ४ वाजता घोडेगाव झापवाडी रोडवरील याव्हे यिरे गुड न्युज चर्च येथे होणार आहे. आमदार विठ्ठलराव लंघे व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.
स्पर्धेचे पहिले बक्षीस रोख ५० हजार, द्वितीय बक्षीस रोख ३० हजार, तृतीय बक्षीस रोख २० हजार व चतुर्थ बक्षीस रोख १० हजार रुपये आहे. याशिवाय उत्कृष्ट तबला, हार्मोनियम वादक, गायक, तसेच संघाला प्रत्येकी ५ हजार रुपयांची वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत, असे आयोजक संतोष भिंगारदिवे यांनी सांगितले आहे.
स्पर्धेत मोफत प्रवेश असून वेळेत भजन सादर करणे बंधनकारक आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी याव्हे यिरे गुड न्युज चर्च, बराखा चर्च, ख्रिस्त राजा चर्च, संत पेत्र चर्च व भजनी मंडळ, तसेच घोडेगाव ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सागर पाटोळे, जीवन पहिलवान यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक तसेच समस्त घोडेगाव ग्रामस्थांंच्या वतीने करण्यात आले आहे.