गुड न्युज ! लवकरच सुरू होतेय ‘रविवारची ऑनलाईन चित्रपट शाळा’


पुणे - 'चित्रभाषा' प्रस्तुत करत आहे ‘रविवारीची चित्रपट शाळा’ – एक खास ऑनलाइन कार्यशाळा जी चित्रपट निर्मितीतील मूलभूत गोष्टी शिकविणार आहे. ही एक महिन्यांची कार्यशाळा १ जून २०२५ पासून सुरू होणार आहे.


ही कार्यशाळा प्रत्येक रविवारी घेण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्यांना सकाळी ७ ते १० किंवा दुपारी २ ते ५ अशा दोन बॅचपैकी कोणतीही निवडण्याची मुभा आहे.

या कार्यशाळेचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रसिद्ध लेखक, संकलक आणि दिग्दर्शक महंतेश्वर भोसगे यांच्यासोबत शिकण्याची संधी मिळणार आहे. कथाकथन, संकलन आणि दिग्दर्शन या चित्रपट निर्मितीच्या महत्वाच्या पैलूंवर त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

नावनोंदणीसाठी इच्छुकांनी “Interested in Ravivarchi Chitrapat Shala” हा विषय असलेला ईमेल chitrabhasha24@gmail.com या पत्त्यावर पाठवावा किंवा 7767092525 या क्रमांकावर WhatsApp संदेश पाठवावा.

नाव, वय, ठिकाण, निवडलेली बॅच आणि संपर्क तपशील नमूद करणे आवश्यक आहे. मर्यादित जागा असल्याने लवकरात लवकर नोंदणी करणे गरजेचे आहे. या जूनपासून तुमच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाची सुरुवात ‘रविवारीची चित्रपट शाळा’सोबत करा.

नवोदित कलाकार, विद्यार्थी, चित्रपटप्रेमी यांच्यासाठी ही कार्यशाळा खास संधी ठरू शकते, अशी माहिती आयोजक महांतेश्वर भोसगे यांनी दिली आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !