जबरदस्त ! क्राईम ब्रँच पोलिसांची मोठी कामगिरी, दुचाकीचोरांची टोळी पकडली


अहिल्यानगर - अहिल्यानगरसह इतर जिल्ह्यांमध्ये मोटारसायकल चोरी करणारी सराईत टोळी जेरबंद झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी ही कारवाई करत २ आरोपींना अटक केली आहे.

त्यांच्याकडून एकूण ८ लाख ७० हजार रूपये किमतीच्या ८ मोटारसायकल्स जप्त करण्यात आल्या आहेत. सोमवार दि. २६ मे २०२५ रोजी राहाता ते पिंपळस रोड, राहाता येथे ही कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव व गणेश भिंगारदे, गणेश लोंढे, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, अशोक लिपणे, रणजीत जाधव, रमीजराजा आत्तार, भगवान थोरात, सुनिल मालणकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड व महादेव भांड या पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला.

या कारवाईत ओमकार उर्फ भैय्या शैलेश रोहम (रा. रांजणगाव रोड, ता. राहाता) व सोनू सुधाकर पवार (रा. साकुरी, ता. राहाता) या आरोपींना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.

तपासादरम्यान, आरोपींनी अजून एक साथीदार गणेश गोरखनाथ दरेकर (रा. पिंपळगाव जलाल, ता. येवला, जि. नाशिक) याच्यासह अहिल्यानगर, नाशिक, पुणे व छत्रपती संभाजीनगर येथून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे.

जप्त केलेल्या मोटारसायकल्स : 
• रॉयल एनफिल्ड बुलेट (२)
• बजाज पल्सर १५० आणि १२५ सीसी
• होंडा युनिकॉन
• हिरो एचएफ डिलक्स
• बजाज प्लॅटीना १०० (२)

या कारवाईमुळे राहाता, श्रीरामपूर, येवला, पुणे विमानतळ, नांदगाव येथील गुन्ह्यांची उकल झाली आहे. उर्वरित वाहनांची चौकशी व कायदेशीर कारवाई सुरू आहे. राहाता पोलीस स्टेशनमार्फत अधिक तपास सुरू आहे.

या धडाकेबाज कारवाईमुळे अहिल्यानगर पोलिसांचे कौतुक होत आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सतत कार्यरत असल्याची प्रतिक्रिया पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी व्यक्त केली आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !