येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
अहिल्यानगर – राज्याच्या साहित्य क्षेत्रातील मानाची संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) यांच्यातर्फे दिला जाणारा श्री. शांतादेवी व बाबुराव शिरोळे विशेष ग्रंथकार पुरस्कार 2024 येथील उपक्रमशील शिक्षक व साहित्यिक उमेश घेवरीकर यांना प्रदान करण्यात आला.
पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात, हा पुरस्कार प्रख्यात लेखिका डॉ. सविता सिंह, मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे आणि कार्याध्यक्ष श्री. मिलिंद जोशी यांच्या हस्ते श्री. घेवरीकर यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे आहे.
श्री. घेवरीकर यांनी बालनाट्य, बालकुमार कथासंग्रह, कविता, पथनाट्य अशा विविध साहित्यप्रकारांमध्ये मुलांसाठी विपुल लेखन केले असून, त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्यस्तरावर पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या साहित्यसेवेच्या गौरवार्थाने त्यांना हा विशेष पुरस्कार मिळाला आहे.
या यशाबद्दल अंजली कुलकर्णी, चंद्रकांत पालवे, जयंत येलूलकर, दिलीप गरुड, माधव राजगुरू, प्रा. रमेश भारदे आणि हरीश भारदे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. श्री. घेवरीकर यांचा हा सन्मान शेवगाव व साहित्य क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.