येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
नाशिक : "युनिक ब्रेन बुस्टर प्री-स्कूलमध्ये आयोजित खास फादर्स डे कार्यक्रम खऱ्या अर्थाने युनिक ठरला" अशा भावना व्यक्त करून पालकांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.
या कार्यक्रमात मुलांनी आपल्या वडिलांसोबत आनंदाचे क्षण अनुभवले आणि त्यांच्या प्रेम व त्यागाला मानवंदना दिली. शाळेच्या आवारात आयोजित या कार्यक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वडिलांसाठी युनिक टीमने खास बनवलेल्या ‘सुपर डॅड’ मेडल्स व ट्रॉफी आणि भाव संदेशांनी सर्वांचे मन जिंकले.
मुलांचे सादरीकरण : मुलांनी वडिलांसाठी 'माझा बाबा सर्वोत्तम' या थीमवर आधारित नृत्याचे सादरीकरण केले. मुलांनी वडिलांसोबत घातलेल्या वेळाने वातावरण उत्साहपूर्ण बनवले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते 'सुपर डॅड' स्पर्धा, ज्यामध्ये वडिलांनी मजेदार टास्क पूर्ण केले. यात संगीत खुर्ची टास्क मध्ये सहभागी होऊन पालकांनी मनमुराद आनंद लुटला. सहभागी वडिलांना स्पेशल बनवलेली ट्रॉफी आणि 'सुपर डॅड' मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आले.
"हा कार्यक्रम मुलांना वडिलांचे त्यांच्या आयुष्यातील महत्त्व समजावून सांगण्याचा आणि त्यांच्याशी बंध मजबूत करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे." यापुढे देखील अशाच स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करून पालक आणि स्कुल यांचा रूणानुबंध जपून विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी नेहमी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही देते. - सौ. आशा अनपट, डायरेक्टर
पालकांचा उत्साह : हरिष भोर, विकास देसले, शंकर भदरगे, रोशन पवार, उमेश देवतळे, गणेश चांदगुडे, सौ. नीलिमा माळी, अभिजीत कुळथे, शाम वामणे, संतोष शिंदे आदि पालकांनी या कार्यक्रमाचे अगदी मनापासून तोंडभरून कौतुक केले.
मुलाच्या स्कूलने वडिलांच्या सन्मानार्थ आयोजित केलेला हा कार्यक्रम अनमोल आहे. युनिक ब्रेन बुसटऱ् स्कूलने आयोजित केलेला हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने 'युनिक' आहे. वडिलांनी मुलांना लिहिलेले पत्र आणि मुलांनी वडिलांना लिहिलेले पत्र एकत्रित करून दिलेली भेटवस्तू आयुष्यभर जतन करून ठेवण्यासारखी आहे.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या वडिलांनी मुलांसोबत घालवलेल्या या क्षणांना अविस्मरणीय म्हटले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने सर्व वडिलांसाठी बनवलेल्या भेटवस्तू आणि स्पेशल स्मृतिचिन्ह देण्यात आले. हा उपक्रम मुल आणि वडिलांमधील नाते अधिक दृढ करणारा ठरला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रियंका चोक, रुपाली नारखेडे, हर्षाली हीरे, रोशनी पवार या स्कूलच्या ट्रेनर्स, स्टाफ व दमयंती चौधरी आणि रुपाली गवळी या मदतनीस यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सीमा देवतळे यांनी केले. तर आभार प्रियंका चोक यांनी मानले.