डीवायएसपी खाडेंच्या टीमचा धमाका : ७५.८० लाखांचा मुद्देमाल जप्त, ९ जणांवर गुन्हा


अहिल्यानगर - नेवासा तालुक्यातील बोधेगाव येथे गोदावरी नदी पात्रातून विनापरवाना वाळू उपसा करताना विशेष पोलीस पथकाने धाड टाकत धाडसी कारवाई केली. या कारवाईत ७५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी ९ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली.

दि. २५ जून रोजी गोपनीय माहितीच्या आधारे पथक बोधेगाव येथील गोदावरी नदीकाठी पोहोचले. तेथे जेसीबीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा करत ट्रॅक्टरमध्ये वाळू भरली जात असल्याचे निदर्शनास आले.

पोलीसांनी अचानक छापा टाकताच काही जण पळून गेले, तर काहीजणांना पाठलाग करून पकडण्यात आले. यामध्ये प्रविण म्हस्के, विशाल ठोंबरे (जेसीबी चालक-मालक), व अभिषेक जाधव (वाळू भरताना आढळले) अशी तीन जणांना अटक केली आहे.

इतर सहा आरोपी फरार आहेत, त्यामध्ये राजेंद्र गोलांडे, दिलीप शेलार, कृष्णा परदेशी, कल्याण उन्हाळे, काका पठारे व कुबोटा ट्रॅक्टरचा मालक यांचा समावेश आहे. कारवाईत ३० लाखांचा जेसीबी, विविध कंपन्यांचे सहा ट्रॅक्टर-ट्रॉली, तसेच अंदाजे ५ ब्रास वाळूसह एकूण ७५.८० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

संबंधित आरोपींवर नेवासा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६२३/२०२५, भादंवि कलम ३०५(ई), ३(५) सह पर्यावरण संरक्षण कायदा कलम ३/१५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सहायक फौजदार शकील शेख, हेड कोन्स्टेबल शंकर चौधरी, अजय साठे, पोहेकों दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, सुनिल पवार, उमेश खेडकर, अरविंद भिंगारदिवे, दिनेश मोरे, सुनिल दिघे, अमोल कांबळे, विजय ढाकणे, दिपक जाधव, जालिंदर दहिफळे यांचे पथकाने केली.

या धडक कारवाईमुळे नेवासा तालुका परिसरात खळबळ उडाली असून, अवैध वाळू उपसांवर आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !