अहिल्यानगर - महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व रक्तकेंद्र वैज्ञानिक अधिकारी संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी संदीप येळवंडे (वैज्ञानिक अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, घोडेगाव) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीनिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय उबाळे यांच्यासह जिल्हा रुग्णालय तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांचे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात श्री. येळवंडे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेच्या कार्यपद्धती, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न व विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा झाली.
श्री. येळवंडे यांनी संघटनेच्या हितासाठी सक्रिय काम करण्याची ग्वाही दिली. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील वैद्यकीय प्रयोगशाळा क्षेत्रात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.