अहिल्यानगरचं वॉर्डनिहाय वास्तव : ग्राऊंड रिपोर्ट (प्रभाग १७ केडगाव)

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

MBP Live24 - अहिल्यानगर (Ahilyanagar) महापालिकेच्या शेवटच्या आणि सर्वांत विस्तीर्ण प्रभागांपैकी एक असलेल्या प्रभाग क्र. १७  केडगावमध्ये (Kedgaon) विकासकामांचे असमान चित्र ठळकपणे दिसते. नागरी वसाहतींपेक्षा मळ्यांचे प्रमाण अधिक असलेल्या या प्रभागात मूलभूत सुविधांचीच टंचाई जाणवते.

नागरिकांना पाच-पाच दिवस पाणी मिळत नाही, तेही कमी दाबाने; त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्यांची अवस्था चिंताजनक असून अनेक ठिकाणी ड्रेनेजची कोणतीही सोय नाही. कचरागाडीचे अनियमित फेर्‍यांमुळे स्वच्छतेचा प्रश्न आणखी गंभीर झाला आहे.

रेल्वे स्थानक परिसर, मल्हार चौक, इंदिरानगर, हनुमाननगर, शास्त्रीनगर, मोहिनीनगर, सुशांतनगर, एकता कॉलनी आदी मोठ्या लोकवस्ती भागांचा या प्रभागात समावेश असून, सुमारे ८० टक्के केडगावचा भाग या हद्दीत येतो. काही ठिकाणी चकचकीत रस्ते, तर काही ठिकाणी खड्ड्यांनी भरलेले मार्ग, अशी तफावत नागरिकांना जाणवते.

वास्तव असे की, एका बाजूला विकासकामांचा डोंगर तर दुसऱ्या बाजूला नागरी समस्यांचा ढिगारा उभा आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची अपेक्षा एकच आहे. ती म्हणजे मूलभूत सुविधांची समान आणि शाश्वत पूर्तता.

काय म्हणतात नागरिक ?

  • मोहिनीनगर : मुख्य रस्त्यांची दुरवस्था; चार–पाच दिवस पाणीपुरवठा नाही. अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष; भागात उद्यान नाही, मोकळे भूखंड विकासाशिवाय पडून.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन : मनपाचे गंभीर दुर्लक्ष; भवनाच्या मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची स्थानिकांकडून मागणी.
  • लोंढे मळा - जय मल्हार नगर : ड्रेनेज व्यवस्था नसणे हा मोठा प्रश्न. कचऱ्याची गाडी नियमित येत नसल्याने परिसरात अस्वच्छता.
  • शास्त्रीनगर व इतर वसाहती : आठवड्यातून एकदाच पाणी, तेही कमी दाबाने. ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यानाचा अभाव. रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब.
  • सुशांतनगर : अर्धेे वीज दिवे बंद; विजेचे खांब तुटलेले. मोकळे भूखंड दुर्लक्षित अवस्थेत.

या सर्व तक्रारी प्रभागातील मूलभूत सुविधांच्या असमानतेचे स्पष्ट चित्र मांडतात.

  • पाण्याबाबत नागरिकांची ओरड
  • मोहिनीनगर भागातील रस्त्याची दयनीय अवस्था
  • कांबळे मळ्याकडे जाणारा पूल मध्यंतरी पुरामुळे खचला.
  • या पुलाला मोठे भगदाड पडले. वाहतुकीसाठी विशेषतः
  • रात्रीच्या वेळी हा पूल धोकादायक बनला आहे.
  • कांबळे मळ्याकडे जाणाऱ्या पुलाला भगदाड पडले आहे.
  • हा पूल धोकादायक बनला आहे.
  • शास्त्रीनगर भागात रस्त्यावर पडलेला कचऱ्याचा ढीग
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची दुरवस्था झाली आहे.

मुख्य नागरी अडचणी

  • उद्यानांचा पूर्ण अभाव : प्रभागात कुठेही प्रशस्त उद्यान नाही; ज्येष्ठ, महिला, बालकांसाठी एकही सुविधा नाही. शास्त्रीनगरच्या शनी मंदिराशेजारील मोकळा भूखंड अद्याप विकसित नाही.
  • मळ्यांची वाढती समस्या : प्रभागात नागरी वसाहतींपेक्षा मळ्यांची संख्या जास्त. खैरे चाळ, अचानक चाळ, कायनेटिक चौक व रेल्वे स्टेशन परिसरातील दाट लोकवस्तीच्या चाळी नव्याने समाविष्ट — मूलभूत सुविधा अत्यल्प.
  • सुविधा पुरविण्याचे आव्हान : मळे विखुरलेले आणि एकमेकांपासून दूर; मनपाला पाणी, रस्ते, ड्रेनेज पुरविणे कठीण. त्यामुळे अनेक मळे सुविधांपासून वंचित.
  • आंबेडकर सांस्कृतिक भवनाची दुरावस्था : भवनाचा भाग पुरामुळे खचलेला; दरवाजे–खिडक्या तुटलेल्या, वीजपुरवठा बंद. संपूर्ण दुर्लक्ष.
  • केडगाव देवी रस्त्याची दयनीय अवस्था : रोज हजारो लोकांची ये-जा; रस्ता खड्डेमय, अतिक्रमण आणि झुडपांचा वेढा.
  • नागरिकांचे जीवघेणे रस्ते पार करणे : केडगाव वेशीसमोरील नगर–पुणे महामार्ग ओलांडताना धोका; सिग्नल, पूल, भुयारी मार्ग काहीच नाही. विद्यार्थ्यांना मोठी कसरत.
  • पाण्याचा गंभीर टंचाई प्रश्न : शास्त्रीनगर, मोहिनीनगर, हनुमाननगर, इंदिरानगर भागांत पाच-पाच दिवस पाणी नाही. नागरिकांची एकच मागणी — “पाणी प्रश्न कधी सुटणार?”
  • रस्त्यांमध्ये झकास–भकास विरोधाभास : काही ठिकाणी उत्तम काँक्रिट रस्ते; पण बहुतेक अंतर्गत रस्त्यांची अवस्था बिकट. नवीन वसाहतींमध्ये अद्याप मातीचेच रस्ते.
  • ड्रेनेजचे अपुरे जाळे : मोहिनीनगर, दुधसागर सोसायटी व नवीन वसाहतींमध्ये काही भाग ड्रेनेजविना. सांडपाणी रस्त्यावर.
  • कचरा व्यवस्थापन कोलमडलेले : कचरागाडी वेळेवर नाही; साफसफाई काही निवडक भागातच. परिसरांत अस्वच्छता वाढलेली.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !