शाब्बास ! गार्गी चांदगावकर 'सीए' अंतिम परिक्षा उत्तीर्ण


शेवगाव (अहिल्यानगर) - येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाची गुणवंत माजी विद्यार्थिनी गार्गी राजेंद्र चांदगावकर सीएची फायनल (CA Final Exam) परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.

गार्गी हिने दहावी (SSC) नंतरच आपले ध्येय निश्चित करून सीए व्हायचे स्वप्न पाहिले होते. त्यानुसार तिने स्वतः तयारी करत खडतर समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.

तिच्या यशात तिची आई आरती चांदगावकर यांच्यासह  संजय चांदगावकर, निरंजन पोळ यांचा मोलाचा वाटा असल्याचे तिने सांगितले.

भारदे साक्षरता प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. रमेश भारदे, विश्वस्त हरीश भारदे, कार्यालय प्रमुख सदाशिव काटेकर, प्रा. संजय कुलकर्णी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

भारदे कनिष्ठ महाविद्यालयातून (Bharde Junior College) आजवर २५ पेक्षा जास्त विद्यार्थी सीए झाले असून ही परंपरा गार्गी हिने पुढे सुरू ठेवली असल्याची भावना हरीश भारदे यांनी व्यक्त केली.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !