अहिल्यानगर - इंग्रजी शाळांनी एकत्रित येऊन घेतलेल्या आंतर शालेय मैदानी स्पर्धा विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना नक्कीच वाव देतील असे प्रतिपादन मेस्टा संघटनेचे (MESTA Association) अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी केले. मेस्टा संघटनेच्या नगर शहर व व तालुका सदस्यांच्या वतीने साई इंग्लिश मीडियम स्कूल नवनागापूर आंतर शालेय क्रीडा स्पर्धांचे (Sport Festival) आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी तायडे पाटील बोलत होते. यावेळी राजू नगरकर, दक्षिण अध्यक्ष देविदास गोडसे, माऊंट लिट्रा स्कूलचे सुनील लोटके, मीराज स्कूलच्या सौ. बारस्कर, साई इंग्लिश स्कूलचे आदर्श ढोरजकर, माऊली स्कूल शेंडीच्या सविता वाव्हळ, लिटिल फ्लावर स्कूल खारे करजूनेचे नरवडे, उपस्थित होते.
तसेच डॉ. शरद कोलते स्कूल पारगावचे प्रा. विजय शिंदे, जीनियस ग्लोबल स्कूलचे जगदीश देशमुख, ब्ल्यू डायमंड अकॅडमीचे सुजित डोंगरे, राउ इंग्लिश मीडियम स्कूल खारे करजूनेच्या दीपाली झंजाड, ज्ञानदीप प्री स्कूलचे कातोरे, असे सर्व विश्वस्त उपस्थित होते.
या स्पर्धेत पूर्व प्राथमिक व प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी बुक बॅलन्स, धावणे, रिले, फ्रॉग जॅम्प या स्पर्धाचे आयोजन केले होते. एकूण १० शाळांनी यात सहभाग घेतला. स्पर्धेत क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पदके वितरित करण्यात आली.
तायडे पाटील म्हणाले की मेस्टा संघटना राज्यस्तरावर काम करत असताना तालुकास्तर व शहरातील शाळांनी एकत्र येऊन अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने घेतले, तर विद्यार्थ्यांसाठी हे एक चांगले व्यासपीठ असेल.
यातूनच संघटनेची देखील योग्य पद्धतीने बांधणी होण्यास मदत होईल यावेळी विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करण्यात आली होती. सुनील लोटके यांनी पाहुण्यांचा परिचय व सत्कार केला. यावेळी विश्वस्तांच्या सभेमध्ये सांस्कृतिक स्पर्धा देखील घेण्याची निश्चित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. सुजित डोंगरे, गोरक्षनाथ नरवडे यांनी केले. तर आभार प्राध्यापक विजय शिंदे यांनी मानले.
