घरफोडीचा थरार ! तब्बल 38 गुन्हे करणारा सराईत जेरबंद, 19.42 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

अहिल्यानगर - सावेडी (Sawedi) उपनगरात घरफोडीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगाराच्या (Criminal) मुसक्या आवळल्या आहेत. जयपूरला कुटुंबासह गेलेल्या व्यापाऱ्याच्या बंद घरावर डल्ला मारून सोने-चांदी, हिरे व रोकड लंपास करणाऱ्या आरोपीकडून १९ लाख ४२ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

घर बंद… आणि चोरट्यांचा डाव यशस्वी - दि. 13 ते 16 डिसेंबर 2025 या कालावधीत सावेडीतील विराज कॉलनी येथील बंगल्याच्या मागील दरवाजाचे लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेची विशेष पथके कामाला लागली.

गोपनिय माहिती… आणि गुन्हे उघडकीस - तांत्रिक व गोपनिय माहितीच्या आधारे रमेश महादेव कुंभार (वय 49, रा. ठाणे) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदार आशीष शिंदे (रा. बारामती, फरार) याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीकडून सोन्याची लगड, कार, मोती, कटर आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  • जप्त मुद्देमाल (एकूण ₹19,42,475/-):
  • ₹15,11,475/- किमतीची 104.670 ग्रॅम सोन्याची लगड
  • ₹4,00,000/- किमतीची मारुती सुझुकी SX4 कार
  • ₹31,000/- किमतीचे 31 मोठे सिल्व्हर मोती
  • कटर, मोठा कटर
38 गुन्ह्यांचा काळा इतिहास ! आरोपी रमेश कुंभार (Ramesh Kumbhar) हा रेकॉर्डवरील सराईत असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत खालीलप्रमाणे एकूण 38 गुन्हे दाखल आहेत:
  • कोथरूड, पुणे शहर : 19 गुन्हे
  • दत्तवाडी/पार्वती, पुणे शहर : 1 गुन्हा
  • येरवडा, पुणे शहर : 3 गुन्हे
  • लोणीकंद, पुणे शहर : 2 गुन्हे
  • हवेली, पुणे शहर : 1 गुन्हा
  • लोणी काळभोर, पुणे शहर : 1 गुन्हा
  • हडपसर, पुणे शहर : 2 गुन्हे
  • बंडगार्डन, पुणे शहर : 1 गुन्हा
  • विश्रामबाग, पुणे शहर : 2 गुन्हे
  • फरासखाना, पुणे शहर : 2 गुन्हे
  • भारती विद्यापीठ, पुणे शहर : 3 गुन्हे
  • सहकारनगर, पुणे शहर : 1 गुन्हा

एलसीबीची दमदार कामगिरी - ही कारवाई पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या केली. आरोपीस मुद्देमालासह तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. शहरात खळबळ उडवणारी ही कारवाई गुन्हेगारांसाठी कडक इशारा ठरली आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !