सावधान ! बोगस मतदान आढळल्यास तक्रार कुठे व कशी करायची?

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

नाशिक - बोगस मतदान हा लोकशाहीविरोधी गंभीर गुन्हा मानला जातो. निवडणुकीदरम्यान बोगस मतदान, ओळख चोरी किंवा जिवंत मतदाराच्या नावावर मतदान झाल्याच्या घटना आढळल्यास मतदारांनी गोंधळून न जाता पुढे नेमके काय करावे, याबाबत MBP Live24 ने आपल्या वाचकांसाठी निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलेल्या  याप्रक्रियेचा घेतलेला लखोल धांडोळा.


बोगस मतदान म्हणजे काय?
  • मतदार प्रत्यक्ष हजर असताना:
  • त्याच्या नावावर आधीच मतदान झालेले असणे
  • रजिस्टरवरील सही किंवा ओळख क्रमांक चुकीचा असणे
  • दुसऱ्या व्यक्तीने खोट्या ओळखीवर मतदान करणे

हे सर्व प्रकार बोगस मतदान म्हणून ओळखले जातात.

तक्रार कोणाकडे करायची?
  • बोगस मतदानाची तक्रार खालील अधिकाऱ्यांकडे करता येते:
  • निवडणूक निर्णय अधिकारी (Returning Officer – RO)
  • जिल्हा निवडणूक अधिकारी (जिल्हाधिकारी)
  • राज्य / भारत निवडणूक आयोग
  • जवळचे पोलीस स्टेशन (FIR साठी)

तक्रार एकाच वेळी एकापेक्षा अधिक ठिकाणी करता येते.

तक्रार कशी करायची? (मुद्देसूद प्रक्रिया)
  • लेखी तक्रार द्या : नाव, मतदार क्रमांक, प्रभाग व बूथ क्रमांक, तारीख व वेळ नमूद करा.
  • ओळखपत्रांचे पुरावे जोडा : आधार कार्ड व मतदार ओळखपत्राची प्रत जोडावी.
  • घटना स्पष्ट शब्दांत लिहा : “माझ्या ऐवजी अज्ञात व्यक्तीने मतदान केले” असे नमूद करणे महत्त्वाचे.
  • पोच पावती घ्या : तक्रार स्वीकारल्याचा पुरावा जतन ठेवा.
तक्रार घेतली नाही तर काय करावे?
  • जर निवडणूक कर्मचारी तक्रार नोंदवत नसतील तर..
  • थेट पोलीस ठाण्यात FIR दाखल करा
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार द्या
  • नकार दिल्याचा उल्लेख तक्रारीत करा
बोगस मतदानाबाबत कायदेशीर कारवाईची तरतूद:
  • Representation of People Act, 1951
  • भारतीय दंड संहिता / भारतीय न्याय संहिता अंतर्गत दोषींवर गुन्हा दाखल होऊ शकतो.

बोगस मतदानाचा संशय जरी आला तरी तक्रार करणे हा मतदाराचा हक्क आणि कर्तव्य आहे. जागरूक मतदार आणि तत्पर प्रशासन यामुळेच स्वच्छ व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया शक्य होते.

बोगस मतदानाबाबत ऑनलाइन तक्रार कशी करायची? – बोगस मतदान, मतदाराच्या नावावर गैरवापर किंवा मतदानाचा हक्क नाकारला गेल्यास ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मतदारांनी भारत निवडणूक आयोगाच्या National Grievance Service Portal (NGSP) वर जाऊन तक्रार नोंदवू शकतात.

यासाठी https://eci-citizenservices.eci.nic.in या संकेतस्थळावर लॉगिन करून नाव, मोबाईल क्रमांक, मतदार क्रमांक, घटना व ठिकाणाची माहिती भरावी लागते. तसेच Voter Helpline App किंवा 1950 हेल्पलाइन द्वारेही तक्रार करता येते. तक्रार नोंदवल्यानंतर संदर्भ क्रमांक मिळतो.

ही बातमीही वाचा : आधार दाखवूनही मतदान नाकारले ! बोगस मतदानाचा गंभीर प्रकार

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !