थरार ! गावठी कट्टा व कोयत्यांसह दहशत माजवणारे ५ सराईत गुन्हेगार जेरबंद

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

अहिल्यानगर - दत्तनगर–वडगाव गुप्ता शिवारात गावठी कट्टा (Revolver) आणि लोखंडी कोयते घेऊन दहशत माजवणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांना (Criminals) एमआयडीसी पोलिसांनी (Police) थरारक कारवाईत अटक केली आहे. या कारवाईत एक गावठी कट्टा जिवंत काडतुसासह (Cartage) तसेच तीन लोखंडी कोयते जप्त करण्यात आले आहेत.


दिनांक १४ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक माणिक बी. चौधरी (API Manik Chaudhari) यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती (Information) मिळाली, की काही इसम दत्तनगर वडगाव गुप्ता (Vadgaon Gupta) शिवारात हातात शस्त्रे (Illegal Weapons) घेऊन दहशत करत फिरत आहेत.

या माहितीची खात्री होताच पोलिसांचे तपास (Police Squad) पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांना पाहताच संशयितांनी पळ काढण्याचा (Ran Away) प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करत पाचही आरोपींना जागीच पकडले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
  • हर्षद गौतम गायकवाड
  • वैभव गौतम गायकवाड
  • भुषण चंद्रकांत गाढवे
  • मनजित मदनलाल किसाना
  • स्वप्निल व्यंकटेश म्हेत्रे 

अंगझडती दरम्यान हर्षद गायकवाड याच्याकडे एक गावठी कट्टा व जिवंत काडतुस आढळून आले, तर इतर आरोपींकडे तीन लोखंडी कोयते सापडले. सर्व आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार (Arm Act) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यातील अनेक आरोपींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही धडाकेबाज कारवाई माणिक चौधरी व त्यांच्या पथकातील सहायक फौजदार राकेश खेडकर, हेड कॉन्स्टेबल संदीप पवार, राजु सुद्रीक,  आदींनी यशस्वीपणे पार पाडली. या कारवाईमुळे परिसरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांना चांगलाच धक्का आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !