येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
नेवासा (अहिल्यानगर) - चांदा (Chanda) गावात रविवारी दुपारी शाहीद राजमहंमद शेख (Shahid Shaikh) या युवकाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. या गुन्ह्यात फरार असलेल्या एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सुरज लतिफ शेख (Suraj Latif Shaikh) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला राहाता तालुक्यातील बाभळेश्वर (Babhaleshwar) शिवारात पोलिसांनी पकडले.
रविवारी सायंकाळी बऱ्हाणपुर रोडवर एका चारीशेजारील वस्तीवर सुरु असलेल्या कंदुरीच्या कार्यक्रमात शाहीदचे काही युवकांसोबत वाद झाले. या वादातून गावठी कट्ट्यातून गोळी (Fire) झाडून शाहीदचा खून (Murder) ल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपी सुरज लतिफ शेख याला स्थानिक गुन्हे शाखेने (Crime Branch) ताब्यात घेतले आहे. तर अन्य आरोपी अद्याप फरार आहेत.
शाहिद हा मित्रांसह कंदुरीच्या कार्यक्रमासाठी गेला असता, त्याचे सुरज लतिफ शेख व अक्षय बाळु जाधव (Akshay Balu Jadhav) यांच्याशी आर्थिक व्यवहार आणि जुन्या वादातून पुन्हा वाद झाले. या वादाचे रूपांतर हिंसाचारात होऊन आरोपींनी शाहिदच्या छातीत गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या शाहिदचा जागीच मृत्यू (Shot Dead) झाला.
या घटनेबाबत यासीन इब्राहिम शेख (Yasin Ibrahim Shaikh) यांनी सोनई पोलीस ठाण्यात (Sonai Police Staion) फिर्याद (FIR) दिली असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (DSP Somnath Gharge) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली होती. त्यांनी सूरजला ताब्यात घेतले.
चौकशी केली असता त्याने अक्षय बाळु जाधव व सुरज उबाळे यांच्यासह मिळून खून केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या गुन्ह्यातील अन्य आरोपी फरार आहेत. तर सुरजला पुढील तपासासाठी सोनई पोलीस ठाण्यात हजर केले आहे.
ही बातमी वाचा : चांद्यात गावठी पिस्तुलातून गोळीबार, २४ वर्षीय युवक ठार
ही बातमीही वाचा : चांदा गोळीबाराचा तपास नेमका 'कोणत्या' दिशेने? कायद्याचा 'धाक' संपतोय का?
ही बातमी वाचा : उधारीच्या वादातून झाली हत्या, ‘या’ दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

