ब्रेकिंग न्यूज ! श्रीरामपूर तालुक्यात 'रक्तरंजित गॅंगवार, गोदावरीच्या पात्रात मृत्यूचे थैमान


श्रीरामपूर (अहिल्यानगर) - श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील नायगाव (Naygaon) परिसरातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू (Illegal Sand Racket) उपशाच्या वर्चस्वातून रविवारी मध्यरात्री थरारक आणि रक्तरंजित गॅंगवार (Gang-war) भडकले आहे.

Image : AI Generated (Not Original)

शिर्डीतील कुख्यात ‘पी. एस.’ गॅंग आणि श्रीरामपूर परिसरातील ‘ए. डी.’ गॅंग यांच्यात बेछूट गोळीबार (Fire) झाला. या गॅंगवारमध्ये अखेर एका गँग सदस्याचा मृत्यू (Dead) झाल्याने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे.

रविवारी (दि. ११) रात्री सुरुवातीला दोन गटांत शाब्दिक चकमक झाली. मात्र काही क्षणातच हा वाद हिंसक संघर्षात बदलला. शेकडो तरुणांच्या उपस्थितीत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला.

गोळीबारासोबतच वाहनांची तोडफोड करण्यात आली. दोन वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या, तर एक जेसीबी (JCB) थेट गोदावरी नदीपात्रात (Godavari River) लोटून देण्यात आल्याने घटनास्थळी प्रचंड गोंधळ उडाला.

या धुमश्चक्रीत एक तरुण गंभीर जखमी झाला, तर एक युवक बेपत्ता (Missing) असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, मंगळवारी सकाळी बेपत्ता युवकाचे शव (Dead Body) गोदावरी नदीपात्रात तरंगताना आढळून आल्याने या गॅंगवारला मृत्यूचे गालबोट लागले.

मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणी ग्रामीण रुग्णालयात नेल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, इतकी गंभीर घटना घडूनही दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी कोणीही गेलेले नव्हते.

त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर संशयाचे ढग अधिकच गडद झाले आहेत. नायगाव परिसरात गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असून, महसूल विभागाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

आठ दिवसांपूर्वी महसूल विभागाच्या वाहनाचे वाळू माफियांकडून (Sand Mafia) नुकसान करण्यात आले होते. मात्र त्या घटनेतही कोणतीही तक्रार दाखल न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पोलिसांनी रविवारी रात्री घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सर्व आरोपी पसार झाले होते आणि ठोस पुरावे हाती लागले नव्हते. सोमवारी (दि. १२) उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर (DYSP Jaydatta Bhavar) यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

या रक्तरंजित गॅंगवारमुळे अवैध वाळू उपसा, गँगवर्चस्व आणि प्रशासनाच्या भूमिकेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. आता या प्रकरणात पोलिस कठोर कारवाई करणार की वाळू माफियांच्या दबावाखाली हे प्रकरण दडपले जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री एक फिर्याद (FIR) दाखल झाली. त्यात जमीन खरेदीच्या व्यवहारातून कुख्यात गुंड अर्जुन दाभाडे (Arjun Dabhade) आणि त्याच्या टोळीने हल्ला केल्याचे म्हटले आहे. यात शस्त्राचा (Illegal Arms) वापर व वाहनांची तोडफोड झाल्याचेही म्हटले आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास (Investigation) करत आहेत.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !