कृष्णानगर महिला मंडळाकडून स्वराज्याच्या माऊलीला मानाचा मुजरा

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

अहिल्यानगर - राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) यांची जयंती अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोडवरील (Pipeline Road) कृष्णानगर महिला मंडळाच्या (Krushna Nagar Mahila Mandal) वतीने मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. स्वराज्याच्या पायाभरणी करणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) घडविणाऱ्या या थोर मातेच्या कार्याचा गौरव करत उपस्थित महिलांनी अभिवादन केले.

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या आशा साठे (Aasha Sathe) म्हणाल्या की, राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले संस्कार आणि मुघलांच्या गुलामीला नाकारत स्वराज्य निर्माण करण्यासाठी घेतलेला धाडसी पुढाकार कधीही विसरता येणार नाही. जिजाऊ नसत्या तर स्वराज्य उभे राहिले नसते आणि छत्रपती शिवाजी महाराजही घडले नसते.

अशा या स्वराज्य संस्थापिका माऊलीचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. इतिहास पुसता कामा नये, नव्या पिढीने इतिहास विसरू नये, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. कार्यक्रमात राजमाता जिजाऊंच्या विचारांना उजाळा देत महिलांनी स्वराज्य, संस्कार आणि राष्ट्रप्रेम (Patriotism) याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. संपूर्ण परिसरात प्रेरणादायी आणि गौरवशाली वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमाला आशा साठे, कविता नांगरे, जयश्री सवासे, प्रणाली मते, पंकजा वाकचौरे, प्रतिभा कुऱ्हे, मंगल लांडे, कविता महाजन आणि वंदना रणदिवे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्व उपस्थित महिलांनी राजमाता जिजाऊंच्या कार्याला व स्मृतींना मानाचा मुजरा अर्पण केला.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !