अलीकडेच नावात बदल झालेलं एक शहर (City) ऐन निवडणुकीच्या (Election Fever) धामधुमीत आहे. रस्तोरस्ती पोस्टरबाजी, चौकाचौकात राजकीय चर्चा (Political Gossip) आणि गल्लोगल्ली हालचालींमुळे वातावरण आधीच तापलेलं आहे. अशात मध्यरात्री घडलेला एक किस्सा गेल्या काही दिवसांपासून शहरात दबक्या आवाजात पण खमंग चर्चेत आहे.
निवडणूक आचारसंहितेच्या काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी खाकी गणवेशातील एक डॅशिंग व्यक्तिमत्त्व रात्री उशिरा आपल्या सहकाऱ्यांसह शहर आणि उपनगरात फेरफटका (Petroling) मारत होते.
शिस्त आणि दरारा, यासाठी ओळख असलेल्या या व्यक्तिमत्त्वाची नजर उपनगरातील एका टोळक्यावर (Group of Youths) पडली. आचारसंहिता सुरु असल्याने खाकीतील व्यक्तीने युवा मंडळींना घरी जायला सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांचं सांगणं सरळ होतं, मात्र समोरून त्यांना मिळालं उद्धट उत्तर.
झालं. शब्दाने शब्द वाढत गेला आणि पाहता पाहता प्रकरण हमरीतुमरीवर पोहोचलं. कायदा, शिस्त (Law and Order) आणि आचारसंहिता समजावण्याचा संयम एका क्षणी सुटला आणि संतापाच्या भरात खाकीतील त्या डॅशिंग व्यक्तिमत्त्वाचा हात सफेद सदऱ्यातील मुजोर युवा कार्यकर्त्याच्या गालावर सणदिशी आदळला.. (Slaped) अशी जोरदार कुजबुज आहे.
एका क्षणातच वातावरण बदललं. हा प्रकार कानी पडताच त्या युवकाचे वडील (Father) घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती अधिक बिघडू नये, निवडणुकीच्या काळात पुढील अडचणी (Complications) ओढवू नयेत, हे ओळखून त्यांनी आपल्या मुलाच्या वर्तनाबद्दल सपशेल माफी (Apology) मागितली.
प्रकरण तिथेच आवरले जावे आणि निवडणुकीला गालबोट लागू नये, या विचाराने खाकीतील त्या व्यक्तिमत्त्वानेही विषय पुढे जास्त न ताणता शांतपणे तिथून निघून जाणे पसंत केले, असे सांगितले जात आहे.
ही घटना तशी तिथेच संपली असली, तरी शहरात तिची चर्चा सुरुच आहे. 'खाकीतील प्रामाणिक डॅशिंग व्यक्तिमत्त्वाने सफेद वेशातील मुजोरपणाची चांगलीच खबर घेतली', अशी खुमासदर चर्चा चहाच्या टपरीपासून राजकीय बैठकांपर्यंत रंगता आहे.
जिथे सत्ता, वर्दी, अहंकार आणि दरारा यांची ठिणगी कधी, कुठे आणि कशी उडेल, याचा नेम सांगता येत नाही. तिथे हा किस्सा निवडणुकीच्या रणधुमाळीतला चर्चेचा विषय ठरला आहे.
