येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - अकोले तालुक्यातील भंडारदरा (Bhandardara Dam) परिसर म्हणजे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि निसर्गसंपन्न पर्यटनस्थळ (Tourist Place) आहे. धरण (Dam), रंधा धबधबा (Randha Waterfall), हरिश्चंद्रगडावरील (Harishchadra Gad) कोकणकडा (Kokankada) याठिकाणी वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र, या निसर्गरम्य सौंदर्यामागे आता एक भीषण वास्तव (Death Mystery) लपलेले आहे.
गेल्या दोन वर्षांत भंडारदरा परिसरात तब्बल पाच अनोळखी मृतदेह (Unknown Dead Body) आढळून आले आहेत. त्यातील एक तरुणी (Young Girl) व तीन पुरुषांच्या मृत्यूचे गूढ अद्यापही उकललेले नाही. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी २५ ते ३० वयोगटातील एका तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
मृत्यू होऊन बराच काळ लोटल्याने तिची ओळख (Identity) पटवणे पोलिसांसाठी आव्हान ठरले. राजूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार यांनी परिसरात चौकशी, सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासणी, तसेच विविध माध्यमांतून माहिती प्रसारित करण्याचे प्रयत्न केले. मात्र, नाव, गाव, पत्ता किंवा नातेवाईकांचा थांगपत्ता लागला नाही.
मृत्यूनंतरही ‘अनोळखी’, अखेर बेवारस अंत्यसंस्कार : पोलिस नियमांनुसार, अनोळखी मृतदेह आठवडाभर जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागृहात ठेवला जातो. या काळात नातेवाईकांचा शोध घेतला जातो. या तरुणीबाबत नाशिक, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूर आदी जिल्ह्यांतील बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासल्या गेल्या. तिचे कपडे, पादत्राणे, छायाचित्र दाखवूनही कोणतीही ओळख पुढे आली नाही. अखेर, ती तरुणी मृत्यूनंतरही बेवारस (Unidentified) ठरली.
भंडारदरा बनतोय गुन्हेगारांसाठी ‘सेफ झोन’?
याआधीही भंडारदरा, रंधा धबधबा आणि हरिश्चंद्रगड परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी चार अनोळखी मृतदेह सापडले होते. या घटना अपघात? (Accident) आत्महत्या? (Suicide) की घातपात? (Mystery) या प्रश्नांची उत्तरे आजतागायत मिळालेली नाहीत. पोलिसांनी आवाहन करूनही ओळख न पटणे आणि तपास (Investigation) अर्धवट राहणे, यामुळे गुन्हेगारांसाठी हा परिसर ‘सेफ झोन’ (Safe Zone) ठरत आहे का? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.
- या तरुणीला भंडारदऱ्यात कोणी आणले? की ती स्वतः आली होती?
- पाचही मृत्यूंमध्ये काही समान दुवा आहे का?
- पर्यटनस्थळी सीसीटीव्ही असूनही तपासात अपयश का?
- आत्महत्या असल्यास कारण काय?
- आणि खून असल्यास आरोपी कुठे गायब झाले?
- इतक्या मोठ्या परिसरात बेपत्ता तरुणीची एकही माहिती का मिळत नाही?
- सर्व पाच मृत्यूंचा कॉमन लिंक अॅनालिसिस करणे
- मोबाईल टॉवर डेटा व जुन्या कॉल रेकॉर्ड्सचा अभ्यास
- राज्यस्तरीय बेपत्ता व्यक्ती डेटाबेसशी समन्वय
- पर्यटनस्थळांवरील सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत करणे
- सोशल मीडिया, एआय फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर
- स्वतंत्र विशेष तपास पथक (SIT) नेमण्याची गरज
भंडारदरा धरण परिसर हा केवळ एक पर्यटनस्थळ राहिलेले नाही, तर ते सध्या ‘डेथ मिस्टरी टुरिस्ट स्पॉट’ (Death Mystery Tourist Spot) बनत चालले आहे. जोपर्यंत या पाचही मृत्यूंचे गूढ उकलले जात नाही, तोपर्यंत पर्यटकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह (Question Mark) कायम राहणार आहे. त्यामुळे पोलिसांसमोरील आव्हान (Challange) वाढत आहे.

