येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - बाणेश्वर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात (Baneshwar College) सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या बहि:शाल शिक्षण मंडळांतर्गत डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला यशस्वीरीत्या पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
प्रा. मयुरी बारवकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. व्याख्यानमालेतील पहिले पुष्प संगमनेर येथील डॉ. अनिल देशपांडे यांनी ‘असे जगा असे रहा’ या विषयावर गुंफले. सकारात्मक दृष्टिकोन, योग्य निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास हेच यशाचे प्रमुख सूत्र असल्याचे त्यांनी प्रभावी उदाहरणे व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून स्पष्ट केले.
दुसरे पुष्प प्रा. डॉ. मोहनराव देशमुख यांनी ‘सामान्य माणूस आणि राजकारण’ (Common Man and Politics) या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत समाजातील राजकारणाची भूमिका व नागरिकांची जबाबदारी अधोरेखित केली.
या व्याख्यानमालेसाठी श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व संचालक तसेच अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक लि.चे अक्षय कर्डिले यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. एम. जाधव होते.
यावेळी आयक्यूएसी समन्वयक डॉ. शेख एच. आर., परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. मुळे बी. एम. यांची उपस्थिती होती. प्रा. शीतल भस्मे यांनी आभार प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या व्याख्यानमालेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

