मुंबईत सत्ताधाऱ्यांना मतांचा कौलच नाही?

54 लाख मतदानांपैकी 28 लाख मते ‘राजकीय नकारा’तलोकशाहीचा गंभीर इशारा

नाशिक (अॅड. उमेश अनपट) : मुंबई महानगरपालिका निवडणूक निकालांनी सत्तेचे गणित बदलले असलेतरी जनतेचा स्पष्ट कौल मिळाल्याचा दावा करण्याचे नैतिक अधिष्ठान कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाकडे राहिलेले नाही. कारण मुंबईत झालेल्या सुमारे 54.64 लाख मतदानांपैकी तब्बल 28 लाखांहून अधिक मते ही प्रमुख राजकीय पक्षांच्या बाहेर गेली आहेत. म्हणजेच मुंबईचा बहुसंख्य मतदारवर्ग ‘कोणाच्याही बाजूने नाही’हे आकडे निर्विवादपणे सांगतात.


सत्ताधारी अल्पमतात
तरी सत्ता त्यांच्या हातात!
 चार्टनुसार विजयी उमेदवारांना मिळालेली एकूण मते केवळ 47.72 टक्के आहेत. उर्वरित 52 टक्क्यांपेक्षा जास्त मते ही सत्ता स्थापन करणाऱ्या यंत्रणेच्या बाहेर राहिली आहेत. लोकशाहीत बहुमताचा गवगवा करणाऱ्या पक्षांनी हे स्पष्ट करावे कीअल्पमताच्या आधारावर मिळालेली सत्ता म्हणजे जनतेचा विश्वास आहे का?

भाजप आघाडीवरपण जनमत कुठे? भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 89 जागा मिळवल्या असल्या तरी त्यांना मिळालेले मतदान फक्त 21.58 टक्के आहे. म्हणजे मुंबईतील पाचपैकी चार मतदारांनी भाजपला मत दिलेले नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे मतदान 13.13 टक्के इतकेच आहे. उर्वरित प्रमुख पक्षांची स्थिती तर आणखी दयनीय आहे.

मग प्रश्न उभा राहतो - कोणत्या जनतेच्या नावावर ही सत्ता चालवली जाणार?

अपक्ष आणि बाद मतांचा अर्थ : किरकोळ पक्षअपक्ष उमेदवार आणि बाद मतांची एकत्रित संख्या ही प्रमुख पक्षांपेक्षा जास्त आहे. ही केवळ आकडेवारी नाहीतर राजकीय व्यवस्थेवरचा जनतेचा ठाम नकार आहे. बाद मतांची संख्या ११,६७७ असणे म्हणजे मतदार मतदान केंद्रावर जाऊनही “तुमच्यापैकी कोणीही योग्य नाही” असे सांगत आहे.

मतदार असंतोषाचा स्फोट? महागाईमूलभूत सुविधाभ्रष्टाचारवाहतूकझोपडपट्टी पुनर्वसनपर्यावरण, या प्रश्नांवर राजकीय पक्ष अपयशी ठरल्याचा राग या आकड्यांतून व्यक्त होत आहे. प्रचाराच्या कोलाहलात हरवलेली मुंबईची सामान्य जनता या निवडणुकीत मौन बहुमत म्हणून समोर आली आहे.

लोकशाहीची आकडेवारी की लोकशाहीची फसवणूक? जागा जिंकून सत्ता मिळवता येतेपण जनतेचा विश्वास गमावून सत्ता टिकते का? हा खरा प्रश्न आहे. आज मुंबईत जे घडले आहेते केवळ निवडणूक निकाल नाहीततर राजकीय पक्षांच्या कार्यपद्धतीवरचा जनतेचा आरोपपत्र आहे.

मुंबईत सत्ता कुणाकडेही असोपण जनमत मात्र कुणाच्याही बाजूने ठाम उभे नाही. बहुसंख्य मतदारांनी राजकीय पक्षांवर अविश्वास दाखवला आहे. हा इशारा आज दुर्लक्षित केलातर उद्या हा असंतोष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !