अहिल्यानगर - बहुचर्चित कोठेवाडी खुन खटल्याशी (Kothdwadi Murder Case) संबंधित आरोपी व त्याच्या साथीदारांकडून अहिल्यानगर व बीड(Beed) जिल्ह्यातील तब्बल 12 चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी LCB) तब्बल 8 लाख 2 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी मोठी कारवाई करत सोन्याचे दागिने, मोटारसायकल आणि घरफोडीसाठी वापरलेली शस्त्रे (Arms) हस्तगत केली आहेत.
दि. 15 जानेवारीला शेवगाव तालुक्यातील ढाकणे वस्ती येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत जाऊन चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने (Gold Jewellery) व रोख रक्कम (Cash) लंपास केली होती. महिलेच्या तक्रारीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार एलसीबीच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे बाराबाभळी ते चाँदबीबी महाल परिसरात सापळा रचला. संशयित हालचाली दिसताच पथकाने पाठलाग करून पाच जणांना ताब्यात घेतले.
अटकेतील आरोपींमध्ये यांचा समावेश :
- रोहित नादर चव्हाण (वय 26)
- बंटी टाबर चव्हाण (वय 27)
- करण शिरसाठ भोसले (वय 22)
- अज्ञान उर्फ राजू उर्फ सक्या वकील्या भोसले (वय 50)
- विशाल टाबर चव्हाण हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता अहिल्यानगर व बीड जिल्ह्यातील शेवगाव, श्रीगोंदा, नेवासा, नगर तालुका, सोनई तसेच अंबळनेर परिसरात केलेले 12 गुन्हे उघडकीस आले.
तपासा दरम्यान आरोपींच्या सांगण्यावरून :
- 54 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने
- लगड (7,02,000 रु.)
- घरफोडीसाठी वापरलेली लोखंडी कटावणी
- पाना (500 रु.) आणि
- 1 लाख रुपयांची मोटारसायकल
- एकूण 8,02,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त
मुख्य आरोपी रोहित नादर चव्हाण व बंटी टाबर चव्हाण हे यापूर्वीही गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांत गुंतलेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सर्व आरोपींना मुद्देमालासह शेवगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहेत.
विशेष म्हणजे, अज्ञान उर्फ राजू उर्फ सक्या वकील्या भोसले हा कोठेवाडी खुन प्रकरणात शिक्षा (Jail) भोगून बाहेर आल्यानंतर पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय (Criminal Activities) झाल्याचे समोर आले आहे.
ही संपूर्ण कारवाई एलसीबीच्या पथकाने पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केली असून, या धडाकेबाज यशामुळे शहरासह ग्रामीण भागात गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
