​'डिअर कॉम्रेड' आता आयुष्यभराचे सोबती, विजय-रश्मिका यांचा उदयपूरमध्ये थाटात विवाह!


उदयपूर - दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी विजय देवरकोंडा (Vijay Devarakonda)आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) ज्यांना चाहते प्रेमाने (Virosh) म्हणून ओळखतात, हे विवाहबंधनात अडकल्याची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.


उदयपूरमधील (Udaypur) एका लक्झरी रिसॉर्टमध्ये (Luxury Resort) हा विवाहसोहळा पार पडला. गुरुवार (२७ फेब्रुवारी) सकाळी १०:१० वाजता तेलगू परंपरेनुसार हा विवाहसोहळा पार पडला. हा सोहळा अत्यंत खाजगी असून, त्यात केवळ कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

सुरक्षेच्या कारणास्तव पाहुण्यांना मोबाईल फोन वापरण्यास मनाई करण्यात आली होती, ज्यामुळे सोहळ्याचे फोटो बाहेर आलेले नाहीत. मात्र नंतर दोघांनीही आपल्या सोशल मीडिया हँडलवर फोटो शेअर केले आहेत.

​कोडावा पद्धतीने होणार दुसरा सोहळा - रश्मिकाच्या कौटुंबिक परंपरांनुसार, तेलगू रितीरिवाजांनंतर आता कोडावा (Kodava) पद्धतीचा विवाहसोहळाही होणार असल्याची चर्चा आहे.

विजय आणि रश्मिका यांनी 'गीता गोविंदम' (Gita Govindam) (२०१८) आणि 'डिअर कॉम्रेड' (Dear Comrade) (२०१९) या चित्रपटांमधून एकत्र काम केले आहे. तेव्हापासूनच त्यांच्या केमिस्ट्रीची (Chemistry) चर्चा सर्वत्र आहे.

आता ते दिग्दर्शक राहुल सांकृत्यान यांच्या आगामी 'रणबाली' (Ranabaali) या चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. ​गेल्या अनेक वर्षांपासून या दोघांच्या नात्याबद्दल चर्चा होत असल्या, तरी दोघांनीही यावर मौन पाळले होते.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !