येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
शेवगाव (अहिल्यानगर) : बालवयातच मुलांची पुस्तकांशी मैत्री (Friendship With Books) व्हावी आणि वाढत्या मोबाईलच्या (Mobile) प्रभावापासून त्यांना दूर ठेवता यावे, या उद्देशाने शेवगाव (Shevgaon) तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये 'कुसुमाग्रज वाचन अभियान' (Kusumagraj Vachan Abhiyan) राबवण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (ZP CEO) आनंद भंडारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम तालुक्यात मोठ्या उत्साहात सुरू झाला असून, ठिकठिकाणी वाचनालयांचे (Library) उद्घाटन करण्यात येत आहे.
रामनगर शाळेत उत्साहात उद्घाटन : शहरातील रामनगर जिल्हा परिषद शाळेत (Ramnagar ZP School) या अभियानाचा शुभारंभ गट शिक्षणाधिकारी शैलजा राऊळ व शाळा समिती अध्यक्ष राजू मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापिका प्रीतम बैरागी, भिसे सर, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भापकर वस्ती शाळेत 'ग्रंथदिंडी' : वाचन संस्कृतीचा जागर करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा भापकर वस्ती (Bhapkar Vasti) येथे चक्क ग्रंथदिंडी काढण्यात आली. पालखीमध्ये पुस्तके (Books) ठेवून काढण्यात आलेल्या या दिंडीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.
येथे शाळा समिती अध्यक्ष (School Committee Chairman) रोहिदास बोडखे, अमोल गिर्जे, संतोष रुईकर, शारदा भापकर, मुख्याध्यापिका आरती तागडे व श्रीकांता शिंदे यांच्या उपस्थितीत वाचनालयाचे लोकार्पण झाले.
केद्र प्रमुख रघुनाथ लबडे व विष्णू गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील इंदिरानगर, उर्दू शाळा, वडुले, सामनगाव, खरडगाव, वाघोली, झिरपेवस्ती, शास्त्रीनगर, सारपे वस्ती, भगूर, अमरापूर आणि गहिलेवस्ती यांसह तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळांमध्ये ही वाचनालये स्थापन करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे.
बालवयात मुलांची पुस्तकांशी मैत्री होण्यासाठी व त्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मराठी वाचन संस्कृती जोपासण्याचे काम या अभियानातून नक्कीच यशस्वी होईल, असे मत गटशिक्षणाधिकारी, शेवगाव शैलजा राऊळ म्हणाल्या.

