'शिवमहापुराण' कथेचा भक्तिमय प्रारंभ; गांजेगल्लीत शिवभक्तांचा उत्साह!

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

अहिल्यानगर - श्रावण महिन्याच्या (Shravan Month) पावन पर्वाचे औचित्य साधून अहिल्यानगरमधील गांजेगल्ली, गंजबाजार येथे श्री शिवमहापुराण कथा सोहळ्याचा (Shiv Mahapuran Katha Event) अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात प्रारंभ झाला आहे.

दि. २ ते ६ सप्टेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत ही कथा पार पडणार आहे. कथा प्रवक्ते प.पू. समर्थ भक्त श्री. मंदारबुवा रामदासी यांच्या सुश्राव्य आणि रसाळ वाणीतून भाविकांना शिवमहापुराणाचे निरूपण ऐकण्याची पर्वणी मिळत आहे.

कथेच्या पहिल्या दिवशी गंजबाजार येथील ऐतिहासिक सोमेश्वर महादेव मंदिरापासून एक भव्य शोभायात्रा (Grand Procession) काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, बँड पथक, आकर्षक सजवलेला रथ आणि कलशधारी महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

शिवमहापुराण श्रवणाने मिळते आध्यात्मिक समाधान: मंदारबुवा रामदासी : कथेचे पुष्प गुंफताना मंदारबुवा रामदासी यांनी शिवमहापुराणाचे महत्त्व विशद केले. "श्रावण महिन्यात भगवान शिवाचा महिमा ऐकणे हे भाविकांचे परम भाग्य आहे. शिवकथेच्या श्रवणाने मनुष्याला पुण्यलाभ तर होतोच, शिवाय आध्यात्मिक समाधान (Spiritual Peace) आणि सद्मार्गाची प्रेरणा मिळते," असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान मंगल भक्त सेवा मंडळाचे प्रमुख राजाभाऊ कोठारी यांनी आयोजक सुमित वर्मा यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. कौटुंबिक धार्मिक वारसा पुढे चालवत नव्या पिढीला धर्म आणि संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

पहिल्या दिवसाच्या कथेची सांगता भव्य महाआरतीने (Grand Aarti) झाली. आरतीचे यजमानपद चेतन कांकरिया, रमेशजी सानप, सागरजी गुरव, चंद्रकांतजी मुक्ता, सहदेव परिवार आणि मंगल भक्त सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भूषविले. प्रयास ग्रुपच्या अलका मुंदडा यांच्यासह परिसरातील अनेक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी राजेंद्रजी मालु, ओमप्रकाशजी मुंदडा, सुरेशजी चांडक, पंकज बाजिया, अभय बोरा, चेतन कांकरिया, प्रशांत मुथ्था, गोपाल वर्मा, आनंद कांकरिया, सागर गुरव, प्रणय दळवी, पवन खंडेलवाल, राहुल सारडा तसेच शिव मित्र प्रतिष्ठानच्या युवा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

गांजेगल्ली येथे भाविकांसाठी भव्य मंडप आणि दररोज महाप्रसादाची (Mahaprasad) उत्तम सोय करण्यात आली आहे. या भक्तिमय सोहळ्याचा सर्व शिवभक्तांनी सहकुटुंब लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक सुमित वर्मा यांनी केले आहे.

येथे क्लिक करुन इंस्टाग्रामवर फॉलो करा

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !