शाब्बास ! स्नेहालय सक्षमा प्रकल्पातून ६९ महिलांना नर्सिंगचे धडे

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

अहिल्यानगर - महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘स्नेहालय’ (Snehalaya) संचलित ‘सक्षमा प्रकल्पा’मध्ये (Sakshama Project) बेडसाईड असिस्टंट (Bedside Assistant / Nursing Course) च्या आठव्या बॅचचा उद्घाटन सोहळा पार पडला.

याच वेळी सहाव्या आणि सातव्या बॅचमधील विद्यार्थिनींना प्रमाणपत्रे (Certificate Distribution) वितरित करण्यात आली. या प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत ६९ विद्यार्थिनींनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यापैकी २८ जणी अहिल्यानगर, मुंबई, खामगाव आणि श्रीरामपूर येथील विविध रुग्णालयांत कार्यरत आहेत, तर ४ जणींनी पुढील एएनएम (ANM) आणि जीएनएम (GNM) अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून भोसले हॉस्पिटलच्या भूलतज्ज्ञ डॉ. प्रतिभा भोसले (Dr. Pratibha Bhosale) उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित विद्यार्थिनींना सीपीआर (CPR Demonstration) चे आपत्कालीन प्रथमोपचार प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच, भोसले हॉस्पिटलमध्ये विद्यार्थिनींना प्रत्यक्ष सराव (Practical Training) आणि रोजगाराची संधी (Job Opportunities) देण्याचे आश्वासन दिले.

प्राचार्या राजश्री कुलकर्णी (Rajashree Kulkarni) यांनी प्रास्ताविकात रुग्णसेवेचे महत्त्व आणि शिस्तीचे धडे दिले. तर बाळासाहेब वारुळे, प्रवीण कदम, रुपाली मुनोत आणि विद्यार्थिनी मंगल भळगट, अस्मिता शिरवले यांनी मनोगत व्यक्त केले.

सक्षमा प्रकल्पांतर्गत गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांसाठी तीन महिन्यांचा निवासी नर्सिंग कोर्स मोफत (Free Residential Nursing Course) चालवला जातो. यातून महिलांचे सक्षमीकरण (Women Empowerment) आणि आरोग्यसेवेसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ घडवण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी कदम यांनी केले, तर आभार दीपाली बुरडे यांनी मानले.

येथे क्लिक करुन इंस्टाग्रामवर फॉलो करा

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !