दिवाळीच्या (Diwali) मांगल्याची सांगता करणाऱ्या कार्तिक शुद्ध द्वितीयेला म्हणजेच भाऊबीज (Bhaubeej / Yam Dwitiya) या पवित्र सणाला विशेष महत्त्व आहे.
हा दिवस केवळ बहिणीच्या औक्षण आणि प्रेमाचा नसून, ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मानवी जीवनाला समृद्ध करणाऱ्या अनेक गोष्टींची साक्ष देणारा आहे.
यम आणि यमीच्या नात्याची पौराणिक परंपरा : पौराणिक आख्यायिकेनुसार, यमी अर्थात यमुना (Yamuna) हिने मृत्यूची देवता असलेल्या आपले बंधू यमराजांना (Yamraj) या दिवशी अगत्याने जेवणासाठी आमंत्रित केले, त्यांचे औक्षण केले आणि सुग्रास भोजन दिले.
बहिणीच्या प्रेमाखातर यमुनाने "आजच्या दिवशीतरी बंधू-बहिणीच्या या पवित्र नात्यासाठी तुझे यमपाश सैल कर" अशी आस्चर्यकारक याचना केली, अशी कथा प्रचलित आहे.
याच प्रेमाच्या आणि जिव्हाळ्याच्या आठवणीतून या दिवसाला 'यमद्वितीया' म्हटले जाते. तिन्हीसांजेला द्वितीयेच्या चंद्रकोरीप्रमाणे (Crescent Moon) बहिणी आपल्या भावाच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणि जिव्हाळा वाढीस लागावा म्हणून औक्षण करतात.
ऐतिहासिक दृष्टीकोन: सिंचन व्यवस्थेचा (Irrigation System) शोध आणि यमुना नदीचे नामकरण, आजचा हा सण स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा गौरव करणाराही आहे. आपल्या बहुजन संस्कृतीच्या (Bahujan Culture) जडणघडणीत आणि विकासात यमाची बहीण 'यमुना' हिचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.
- सिंचनाचा शोध: यमुना हिने प्राचीन काळी शेती सिंचन व्यवस्थेचा (Agricultural Irrigation System) यशस्वी शोध लावून त्याची अंमलबजावणी केली होती.
- नदीचे नामकरण: तिच्या याच महान शोधकार्याची आणि स्मरणार्थ भारतातील सर्वात मोठ्या सिंचन व्यवस्थेवर अवलंबून असलेल्या नदीला 'यमुना नदी' (Yamuna River) हे नाव देण्यात आले.
आजच्या आधुनिक युगात सिंचन घोटाळे (Irrigation Scams) आणि चौकशीचे फार्स वारंवार पाहायला मिळतात, परंतु शेतकऱ्यांच्या हिताचे आणि त्यांना खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरणाऱ्या संशोधनांची आजही तितकीच गरज आहे.
दिवाळी म्हणजे दिव्यांच्या असंख्य ओळींचा उत्सव, एकमेकांना भेटण्याचा आणि स्नेह वृद्धिंगत करण्याचा काळ. सुखाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते, पण समाधान (Contentment) हे सर्वांसाठी एकसारखेच असते.
प्रत्येकाला हवा तो स्वप्नदिवा प्रत्येकाच्या आयुष्यात अमूल्य सुख आणि समाधान घेऊन येऊ दे! शुभास्ते पंथानः संतु ! (तुमचा प्रवास मंगलमय होवो!)
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
